नांदेड : महाराष्ट्र शासनाने १६ मे पासून ऑनलाईन नोंदणी करून दारू घरपोच दारू करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी सुद्धा आता दारूविक्रीचे आदेश काढले. नवीन नियमांमध्ये कोणत्याही मद्यविक्रेतांना दुकानातून दारू विकता येणार नाही तर केवळ पूर्वनोंदणी केलेल्या परवाना असलेल्या ग्राहकांना छापील किमतीवर सीलबंद मद्य पुरवठ्याची घरपोच सुविधा देता येईल असा नियम लागू केला आहे.
Read More उदगीर येथे २ कोरोना रुग्ण वाढले
नांदेड जिल्ह्यात २२ मार्चपासून सर्व प्रकारची दारूविक्री बंद करण्यात आली होती त्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये मद्यपींची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. आता महसुलासाठी जिल्हा प्रशासनाने दारू विक्रीस परवानगी दिली आहे. नांदेडच्या शेजारी सर्व जिल्ह्यात दारू विक्री सुरू करण्यात आली होती. नांदेडमद्धेही याबाबत बैठक होऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश काढला त्यानुसार सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत केवळ घरपोच विदेशी दारू, वाईन व बिअर अशा मद्याच्या घरपोच सेवेला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी एक दिवसाचा परवाना ही ताबडतोब मिळणार आहे.