22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रउरलेले सर्व आमदार शिंदे गटात सामील होणार; शंभुराज देसाई यांचा गौप्यस्फोट

उरलेले सर्व आमदार शिंदे गटात सामील होणार; शंभुराज देसाई यांचा गौप्यस्फोट

एकमत ऑनलाईन

सातारा : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीत सगळ्यात पहिल्यांदा बंडखोरी करणारे आमदार शंभुराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे एका शाखेच्या उदघाटन प्रसंगी एक गौप्यस्फोट केल्याने पुढच्या खळबळ उडाली आहे. पुढील पंधरा दिवसात जिल्ह्यातील शिवसेनेचे ९० टक्के पदाधिकारी मुख्यमंर्त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत येतील.

त्याचबरोबर शिवसेनेचे उर्वरित १५ आमदारही आमच्याकडे येणे बाकी असल्याचे शंभुराज देसाई म्हणाले. यावेळी त्यांनी रहिमतपूरचे रहिवाशी नितीन बानुगडे पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

पुढील पंधरा दिवसात जिल्ह्यातील शिवसेनेचे ९० टक्के पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत येतील. त्याचबरोबर शिवसेनेचे उर्वरित १५ आमदारही आमच्याकडे येतील. ते पुढील एक महिन्यातच मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्यासोबत असतील. त्या आमदारांच्या बरोबर माझी चर्चा झाली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या