23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रनवनीत राणांनी केलेले आरोप बिनबुडाचे!

नवनीत राणांनी केलेले आरोप बिनबुडाचे!

एकमत ऑनलाईन

मुंबई: कोठडीत असताना पाणी देण्यात आले नाही, वॉशरुम वापरू दिले नाही, असे आरोप लोकसभेच्या खासदार नवनीत राणांनी केले होते. राणांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला अहवाल देण्यास सांगितले. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी लोकसभा सचिवांना अहवाल पाठवला आहे. या अहवालामुळे राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मी दलित असल्यामुळे मला तुरुंगात पाणी देण्यात आले नाही. मला वॉशरुमही वापरू दिले नाही. दलित असल्यामुळे मला कोठडीत अपमानास्पद वागणूक देण्यात आली, असे गंभीर आरोप खासदार नवनीत राणांनी केले होते. यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. यानंतर लोकसभा सचिवांनी राज्य सरकारला अहवाल देण्यास सांगितले होते. राज्याच्या मुख्य सचिवांनी लोकसभा सचिवांना अहवाल पाठवला आहे. राणांनी केलेले सर्व आरोप मुख्य सचिवांनी खोडून काढले आहेत. मुख्य सचिवांनी दिल्लीला पाठवलेल्या वस्तुस्थितीदर्शक अहवालामुळे राणांच्या अडचणी वाढू शकतात. राणांना तुरुंगात योग्य वागणूक देण्यात आली. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली नाही. त्यांनी पोलिसांवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी राणांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे राणांच्या अडचणी कायम आहेत. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा गेल्या आठवडाभरापासून तुरुंगात आहेत. त्यांनी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. सोमवारी त्यावर सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला. बुधवारी सकाळी निकाल अपेक्षित आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या