37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeमहाराष्ट्रआरोपांवर शिक्कामोर्तब : फडणविसांनी भांडाफोड केल्यावर झाली 1328 कोरोना मृत्यूची नोंद!

आरोपांवर शिक्कामोर्तब : फडणविसांनी भांडाफोड केल्यावर झाली 1328 कोरोना मृत्यूची नोंद!

एकमत ऑनलाईन

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठविल्यानंतर आज अखेर राज्य सरकारला अतिरिक्त 1328 कोरोना बळींची नोंद अधिकृतपणे घ्यावी लागली. मुंबईत 862 आणि अन्य जिल्ह्यांतील 466 कोरोना मृत्यू आज जाहीर करण्यात आले.

असे एकूण 1328 मृत्यू हे अधिकचे कोरोनाचे मृत्यू म्हणून आता नोंदले जातील. यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेल्या 3 महिने ही आकडेवारी लपविणार्‍यांवर काय कारवाई करणार, हे सांगितले गेले पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे.

काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून गेल्या तीन महिन्यांपासून काही कोरोनामृत्यू होऊन सुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारीत दाखविले जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने कारोना बळी कसे नोंदवायचे, याचे स्पष्ट दिशानिर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ ऑडिट कमिटीची कशी काय होऊ शकते? ही समिती मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आहे की, मृत्यूसंख्या दडपण्यासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. अखेर आज राज्य सरकारने हे 1328 मृत्यू अधिकचे असल्याचे मान्य केले आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले.

नेमके काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? काय केले हाते आरोप?

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता का लपविण्यात आले? आणि याबाबत एवढे मोठे दुर्लक्ष का झाले? असे प्रश्न विचारले आहेत. त्याचबरोबर यावर सरकार आता काय कारवाई करणार? कोरोनामुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिका प्रशासनाने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. प्रत्येक प्रकरणावर या समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते.

आता सुमारे ४५१ अशी प्रकरणे दरम्यानच्या काळात समोर आली आहेत, कोरोनामुळे ज्यांचे मृत्यू झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड दाखवली. हे सर्व मृत्यू आयसीएमआरच्या निकषांनुसार कोरोनामुळे झालेले आहेत. ही बाब आता उघडकीस आली आहे. ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम केले. राज्य सरकारच्या वतीने या कमिटीवर काय कारवाई केली जाणार आहे, असा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला. हे प्रकरण लपविण्यासाठी शासनाने एक पत्र पाठवून कोरोनासंदर्भातील सर्व आकडेवारी अपडेट करावी असे म्हटले आहे. ही माहिती तातडीने पाठविण्यास सांगण्यात आले आहे. असले प्रकार करून झालेला प्रकार लपविला जात असल्यामुळे तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read More  देश तुमच्यासोबत आहे, पण काही तरी बोला? संजय राऊतांचा मोदींना थेट सवाल

महापालिकेच्या समितीने आयसीएमआरच्या गाइडलाइन्स डावलून कोरोनामुळे झालेले मृत्यू हे कोरोनाचे नाहीत, असे दर्शविले होते. ही बाब आता आयसीएमआरकडून निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तपासणी करून ३५६ अपात्र ठरविलेले कोरोना मृत्यू आणि काही तपासणीसाठी प्रलंबित ठेवलेली प्रकरणे असे मिळून सुमारे ४५१ मृत्यू हे कोरोनामुळे झाले आहेत आणि आता ते पोर्टलवर तात्काळ नोंदविले गेले पाहिजेत. असे आयसीएमआरने सांगितले आहे. विविध रुग्णालयांनी मृत्यू झाल्यानंतर ते सारे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले असल्याची ५०० प्रकरणे आहेत.

पण ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे ती प्रकरणे सादरच करण्यात आलेली नाहीत. यात सुद्धा कुणाचा दबाव होता आणि नसेल तर असे न करणाऱ्यांवर राज्य सरकार काय कठोर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. लोकांना सजग करण्याचा पारदर्शिता हा एकमेव मंत्र आहे. जनतेपर्यंत कोरोनासंदर्भातील संपूर्ण माहिती योग्य प्रकारे पोहचली तरच ते योग्य काळजी घेऊ शकतात. अशात या दोन्ही प्रकारांकडे पाहता मुंबईत सुमारे ९५० वर अधिकचे मृत्यू हे कोरोनामुळे झालेले आहेत. हा सर्व प्रकार गंभीर असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या