मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या विरोधी पक्षातील नेत्यांनी घोटाळे केल्याचा आरोप करत आहेत. अशातच ईडी विरोधी पक्षातील नेत्यांवर सतत धाडी टाकताना दिसून येत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना आमदार राहुल कुल यांच्यावर शेतक-यांची फसवणूक केल्याचा आणि घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कुल यांनी शेतक-यांची फसवणूक केल्याचंही संजय राऊत म्हणालेत. संजय राऊत यांनी आज पुणे जिल्ह्यातील दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्रही लिहिले आहे.
तर विरोधी पक्षांच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणणा-या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे.
या प्रकरणात सोमय्या मूग गिळून गप्प का बसलेत, असा प्रश्नही राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांचं हे पत्र आज राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे. तर संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आतापर्यंत माझ्याकडे १७ कारखान्यांची प्रकरणे आहेत त्यातील ही पहिलं प्रकरण आहे. राज्यात काही विशिष्ट पक्षातील लोकांच्या मागे चौकशीचे सत्र लावता. मग आपल्या सोबतचे पक्षातले लोक आहेत त्यांच्या गैरव्यावहारावर कोण बोलणार? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
तर पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पाटस च्या भीमा सहकारी कारखान्याचे शेतकरी किरीट सोमय्या यांच्याकडे घेऊन गेले तर ते शेतक-यांना म्हणतात की, जर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे काही घोटाळे असतील तर सांगा मी ते प्रकरण ईडीपर्यंत घेऊन जाईल असंही राऊत म्हणाले आहेत.
तर राहुल कुल यांच्याशी माझा काही वैर नाही काही संबंध नाही हे प्रकरण माझ्या समोर आलं आहे म्हणून मी यासंबधी पत्र लिहल आहे. या संबधी सर्व पुरावे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळतील. देवेंद्र फडणवीस काय करतील ते पाहू. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास नाही. त्यांचं सरकार घटनाबा आहे. मला देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी त्यांना पत्र लिहल आहे असंही संजय राऊत यावेळी म्हणालेत.