25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमंत्र्यांना बंगल्याचे वाटप

मंत्र्यांना बंगल्याचे वाटप

एकमत ऑनलाईन

चंद्रकांत पाटलांना लोहगड, केसरकरांना रामटेक
मुंबई : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर खातेवाटपही झाले. आता नवनियुक्त मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप जाहीर करण्यात आले. त्यानुसार चंद्रकांत पाटलांना लोहगड, गिरीश महाजनांना सेवासदन तर रविंद्र चव्हाणांना रायगड बंगला मिळाला आहे. यासोबतच शिंदे गटाच्या दीपक केसरकरांना रामटेक, राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टॅग बंगला मिळाला. विशेष म्हणजे रामटेकबाबत कोणता ना कोणता अपशकून होतो, असे सांगितले जाते. तोच बंगला आता केसरकरांना मिळाल्यामुळे याची चर्चा रंगली आहे.

खाते वाटपानंतर सगळ््या मंत्र्यांचे लक्ष बंगल्याच्या वाटपाकडे लागले होते. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या मंत्र्यांना कोणते बंगले हवेत, यासाठीच्या सूचना मागावल्या होत्या. यादरम्यान कॅबिनेटमध्ये आमदारांचे रुसवे फुगवे बघायला मिळाले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मंत्र्यांनी कोणते बंगले हवेत, हे देखील संबंधितांना कळवले. त्यानंतर आज मंत्र्यांचे बंगले वाटप जाहीर करण्यात आले.

कुणाला कुठला बंगला?

चंद्रकांत पाटील : सिंहगड
गिरीश महाजन : सेवासदन
रविंद्र चव्हाण : रायगड
अतुल सावे : शिवगड
मंगलप्रभात लोढा : विजयदुर्ग
गुलाबराव पाटील : जेतवन
शंभुराद देसाई : पावनड
संजय राठोड : शिवनेरी
सुधीर मुनगंटीवार : पर्णकुटी
विखे पाटील : रॉयलस्टोन
दीपक केसरकर: रामटेक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या