24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयसलग दुस-यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द

सलग दुस-यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग देशात कमी झाला आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ज्ञानी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षीही अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही अमरनाथ यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. अमरनाथ श्राईन बोर्डाच्या अधिका-यांनी ही यात्रा रद्द करण्याची घोषणा केली. दरम्यान, भाविकांना २८ जूनपासून ऑनलाइन दर्शन घेता येणार आहेत.

भाविकांना बाबा बर्फानी ऑनलाइन दर्शन घेता येणार आहेत. हिमालयाच्या उंच उंच भागात ३८८० मीटर उंचीवर असलेल्या भगवान शिवच्या गुफा मंदिरात ५६ दिवसासाठी यात्रा २८ जून रोजी पहलगाम व बालटालमार्गे सुरू होणार होती आणि २२ ऑगस्टला संपणार होती. यापूर्वी एप्रिल महिन्यात अमरनाथ श्राईन बोर्डाने पवित्र गुफेची यात्रा रद्द करणार असल्याचे म्हटले होती.

यासंदर्भात पत्रकही जारी करण्यात आले होते़ परंतु काही वेळानेच जम्मू काश्मीर माहिती संचालनालयाने यात्रा रद्द करण्याचा आदेश मागे घेतला होता. दरवर्षी जून महिन्यात या ठिकाणी अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात येते. देशाच्या तसेच, जगाच्या कानाकोप-यातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात.

राफेलची १०१ फाल्कन्स स्क्वॉड्रन सज्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या