24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रअमित शहांच्या गाड्यांसाठी अ‍ॅम्ब्युलन्सला रोखले ; व्हीडीओ व्हायरल

अमित शहांच्या गाड्यांसाठी अ‍ॅम्ब्युलन्सला रोखले ; व्हीडीओ व्हायरल

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौ-याची चांगलीच चर्चा आहे. केवळ राजकीय गाठीभेटींमुळेच नव्हे तर आणखी एका गोष्टीची सध्या चर्चा होत आहे. अमित शहांचा ताफा जाण्यासाठी एका अ‍ॅम्ब्युलन्सला रस्त्यावर रोखून धरण्यात आले आहे. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी या विषयाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्विट करत हा व्हीडीओ शेअर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये गोखले म्हणतात की, असे काही मुंबईत होईल अशी कल्पनाही तुम्ही केली नसेल. अमित शहा यांच्या गाड्यांच्या ताफ्याला जाता यावे म्हणून अ‍ॅम्ब्युलन्सला अडवून धरण्यात आले.

अमित शहा यांना झेड प्लस सुरक्षा आहे. म्हणजे ते व्हीआयपी आहेत, व्हीव्हीआयपी नाहीत. तरीही पहिल्यांदाच त्यांच्यासाठी मुंबईतले रस्ते बंद करण्यात आले. भाजपा सत्तेत आल्यापासून हे होत आहे.

अमित शहा हे ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने लालबागचा राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या कठोर टीकेवरून त्यांची चांगलीच चर्चा झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या