25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकन संशोधनात दावा : या औषधाने दाखविले तीन दिवसात परिणाम

अमेरिकन संशोधनात दावा : या औषधाने दाखविले तीन दिवसात परिणाम

एकमत ऑनलाईन

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, यामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजारावर औषध शोधण्यासाठी वैज्ञानिक दिवस-रात्र काम करत आहेत. मात्र अद्याप यावर ठोस औषध उपलब्ध झालेले नाही. असे असले तरी डॉक्टर रुग्णांच्या लक्षणांनुसार त्यांना विविध औषध देत आहेत. अशीच काही औषधे कोरोनाच्या लढ्यात महत्त्वाची ठरत आहेत.

नॅशनल कँसर रिसर्च इंसिट्यूटच्या संशोधकांनी दावा केला आहे की, कॅन्सरच्या औषधामुळे कोरोना संसर्गाची शक्यता कमी होते. ब्लड कॅन्सरच्या औषधामुळे संक्रमित रुग्णांची श्वास घेण्याची समस्या कमी होते व याद्वारे रोगप्रतिकार शक्तीवर देखील नियंत्रण ठेवता येते. सायन्स इम्यूनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, कॅन्सरचे औषध एकॅलब्रुटिनिब कोरोनाच्या रुग्णांमध्ये बीटीके प्रोटीनला ब्लॉक करते. इम्यून सिस्टममध्ये हे प्रोटीन महत्त्वाचे असते. अनेकदा इम्यून सिस्टम जास्त एक्टिव असल्याने हे शरीराला संसर्गापासून वाचवण्याऐवजी सूजण्याचे कारण बनते. इम्यून सिस्टममध्ये सायटोकाइनिन प्रोटीनमुळे असे होते. या प्रक्रियेत ब्रूटॉन टायरोसिन कायनेज प्रोटीन देखील एक भाग असतो. यामुळे कॅन्सरच्या औषधाद्वारे कोरोना रुग्णांमध्ये या प्रोटीनला ब्लॉक केले जाते.

Read More  श्वसनसंस्थेच्या गंभीर विकारग्रस्त १०० बालकांवर यशस्वी उपचार

संशोधकांनुसार, कोरोनाग्रस्तांमध्ये सायटोकाइनिन प्रोटीन जास्त प्रमाणात रिलीज झाल्याने इम्यून सिस्टम उलट्या पद्धतीने काम करते व फुफ्फुसांना नुकसान पोहचवते. कोरोनाग्रस्तांवर करण्यात आलेल्या अभ्यासात आढळले की, त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचा स्तर कमी होऊन सूज वाढली आहे. 11 रुग्णांना दोन दिवस ऑक्सिजन देण्यात आले, तर 8 रुग्णांना दीड दिवस वेंटिलेटरवर ठेवण्यात आले. या रुग्णांना कॅन्सरचे औषध दिल्यानंतर 1 ते 3 दिवसात सूज कमी व श्वास घेण्यास समस्या देखील कमी झाली. 11 रुग्णांना हॉस्पिटलमधून सोडण्यात देखील आले.

सायन्स इम्यूनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, क्लिनिकल प्रॅक्टिससाठी या औषधाचा वापर करण्याचा सल्ला देऊ नये. कॅन्सरच्या औषधाचा प्रयोग खूप कमी लोकांवर झाला आहे. त्यामुळे संशोधकांनुसार याचा वापर रुग्णांच्या स्थितीवर अवलंबून असतो.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या