25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रअमित शहा, नड्डा मुंबईत येणार; गणेश दर्शन की ऑपरेशन महापालिका?

अमित शहा, नड्डा मुंबईत येणार; गणेश दर्शन की ऑपरेशन महापालिका?

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढच्या आठवड्यात मुंबईत येणार आहेत. ऐन महापालिकेच्या तोंडावर अमित शहा मुंबईत येत आहेत. शिवाय शिवसेनेत उभी-आडवी फूट पडल्यानंतरचा शहा यांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. त्यामुळेही या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहा या दौ-यात गणपतीचे दर्शन करणार आहेत. मात्र, शहा गणपतीच्या दर्शनासाठी येत आहेत की महापालिका मोहीम फत्ते करण्यासाठी कानमंत्र देण्यासाठी येत आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

यावेळी महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. शहा यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाही सप्टेंबरमध्येच मुंबईत येणार असल्याने या दोन्ही नेत्यांच्या दौ-यावरून राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अमित शहा हे येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत येत आहेत. या दौ-यात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाऊन शही हे गणपतीचे दर्शन घेणार आहेत. शहा हे दरवर्षी मुंबईत गणेशोत्सवासाठी येत असतात. दरवर्षी ते न चुकता लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेत असतात. शहा हे २०१७ मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते.

तेव्हापासून ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला दरवर्षी मुंबईत येत असतात. मात्र, कोविडमुळे ते दोन वर्षे मुंबईत येऊ शकले नव्हते. मुंबईसह राज्यात गणेशोत्सवही साजरा झाला नव्हता. मात्र, आता कोविडचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. लोकांना सण-उत्सव साजरे करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मुंबईत गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शही हे सुद्धा मुंबईत येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत.

मुंबई महापालिकेवर अधिक फोकस?

राज्यात मुंबई, ठाणे आणि पुण्यासह १४ महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहा मुंबईत येणार आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या भेटीत ते महापालिका निवडणुकीबाबत काही चर्चा करतात का? किंवा पालिकेच्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी लेव्हलला काही सूचना देतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शहा काय रणनीती ठरवतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
.
जे. पी. नड्डाही मुंबईत

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाही मुंबईत येत आहेत. जे. पी. नड्डा हे १५ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. ते १५ आणि १६ सप्टेंबर हे दोन दिवस मुंबईत राहणार आहेत. यावेळी ते भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. नड्डा हे मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. नड्डा आपल्या मुंबई दौ-यात राज्यातील भाजप नेत्यांशी महापालिका निवडणुकांवर चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. खास करून मुंबई महापालिका जिंकण्यावर या भेटीत अधिक चर्चा होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या