22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रअमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबईच्या दौ-यावर आहेत. रविवारी रात्री ते मुंबईत दाखल झालेत. त्यांनी आज लालबाग गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यानंतर ते भाजप कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत.

त्यात ते पदाधिका-यांना मार्गदर्शन करतील. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आता मुंबई महानगर पालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजप आपली कंबर कसताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर शहांचा हा मुंबई दौरा मानला जातो.

लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा यांनी महालक्ष्मी देवीवरील एका पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, विनोद तावडे उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहांना भेटण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली होती. त्यासोबतच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार देखील होते.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
अमित शहांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर लालबाग परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त करण्यात आले आहे. लालबागकडे जाणारे रस्ते देखील पूर्णपणे रिकामे पाहायला मिळत आहे.

शहांचे मराठीतून ट्विट
अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. लालबागला जाण्याआधी अमित शाह यांनी मराठीतून एक ट्विट केले होते.

शहांचा पहिला दौरा

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर अमित शहांचा हा पहिला दौरा आहे. मुंबई पालिकेसह राज्यातील इतर महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी आता भाजपचा डोळा मुंबई पालिकेवर आहे. दरम्यान अमित शहा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची देखील भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

शहा लालबागच्या राजाचे आणि नंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणरायाचे दर्शन घेतील. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यातील गणपतीचे दर्शन घेतील आणि मेघदूत बंगल्यात भाजप प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या