17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रअमोल कीर्तिकर लवकरच शिंदे गटात येणार ;केसरकरांचा दावा

अमोल कीर्तिकर लवकरच शिंदे गटात येणार ;केसरकरांचा दावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून बंड केल्यानंतर सेनेत दोन गट पडले. या दोन्ही गटांतील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. परंतु, पहिल्यांदाच शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी इच्छा अप्रत्यक्षरीत्या बोलून दाखवली आहे.

त्याचबरोबर केसरकर यांनी अमोल कीर्तिकरांबाबतही मोठे वक्तव्य केले आहे. अमोल कीर्तिकर लवकरच बाळासाहेबांच्या विचारासोबत येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटामध्येच आहेत.

काल संजय राऊत यांनी अमोल कीर्तिकर यांची भेट घेतली. यानंतर दीपक केसरकर यांनी असा दावा केला असल्याने ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाला वारंवार धक्के बसत आहेत. दरम्यान काल अनेक कार्यकर्त्यांसह ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे आता केसरकर यांनी केलेल्या अमोल कीर्तिकर यांच्या शिंदे गटात जाण्यावरील दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या