34.2 C
Latur
Thursday, June 1, 2023
Homeअम्फानचा तडाखा!

अम्फानचा तडाखा!

- ओडिशा, पं़ बंगाल, बांगलादेशात मुसळधार पाऊस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
सुपर चक्रीवादळ अम्फानने अखेर भू-भागाला धडक दिली. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार दुपारी अडीच वाजता अम्फान सुंदरबनजवळ (पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलादेशातील हटिया दरम्यान) धडकले. त्याचबरोबर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. किनारी भागात १६५-१८५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. बांगलादेशात जोरदार वारा आणि पावसामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.

अम्फान चक्रीवादळ; ८ राज्यांमध्ये हाय अलर्ट
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अम्फान हे चक्रीवादळ आज बंगालचा उपसागर ओलांडून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाºयावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्तकतेच्या इशारा देण्यात आला आहे. संकटाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या ४१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ८ राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकीकडे कोरोनाचे महासंकट असताना चक्रीवादळाची त्यामध्ये भर पडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Read More  अम्फान चक्रीवादळ आज पश्चिम बंगाल, ओडिसा किनारी धडकण्याची शक्यता

अम्फानचे संकट पाहता, हवामान खात्याने ओडिशा आणि आसामसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर आणि जम्मू-काश्मीरसाठी आॅरेंज अलर्ट जारी केला आहे.
अनेक ठिकाणी वादळी वाºयासह मुसळधार पाऊस सुरू आहे. ओडीसापासून अनेक ठिकाणी ताशी १५५ ते १८५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदजानुसार पश्चिम बंगालच्या किनाºयालगत असणाºया अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल आणि समुद्रात चार-पाच मीटर उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वारे येत असल्याने रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली आहेत. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

तसेच, समुद्र किनाºयाजवळचे अनेक परिसर रिकामे करण्यात आले असून तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ओडिशा आणि बंगालला या वादळाचा सर्वप्रथम सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशातील जवळपास ११ लाख लोकांना किनाºयावरून हलवण्यात आले आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील जवळपास ३ लाखहून अधिक लोकांना किनारपट्टी भागांतून सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अम्फान चक्रीवादळ १८५ किलो मीटर वेगाने पश्चिम बंगालच्या दीघा किना-यावर धडकू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Read More  लातूर तालुक्यातील बोरगावसह जिल्ह्यात नव्याने ४ रुग्ण आढळले

ओडिशा, पश्चिम बंगालमधून ६,५८,६४० लोकांना सुरक्षित स्थळी
अम्फान महाचक्रीवादळामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आतापर्यंत पश्चिम बंगालमधून ५ लाख लोकांना, तर ओडिशातील सुमारे १ लाख ५८ हजार ६४० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे (एनडीआरएफ) प्रमुख एस. एन. प्रधान यांनी दिली.

हे महाचक्रीवादळ समुद्रात भूमीवर येण्यास सुरुवात झाली असून आम्ही त्याच्या हालचालीवर बारिक लक्ष ठेवून आहोत, असे प्रधान यांनी सांगितले. महाचक्रीवादळाचा समुद्रातून भूमीवर शिकराव झाल्यानंतर आमचे खरे काम सुरू होईल. त्यानंतर चक्रीवादळाचा झालेला परिणाम किंवा नुकसान लवकरात लवकर भरून काढत सर्व सोयी सुविधांची उपलब्धता करून द्यावी लागेल. एनडीआरएफची २० पथके ओडिशात तैनात करण्यात आली असून, १९ पथके पश्चिम बंगालमध्ये तयार ठेवण्यात आली आहेत. तसेच, दोन पथके स्टँडबाय ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाकडे बिनतारी आणि उपग्रह संदेशवहनाची साधने देण्यात आलेली आहेत, अशी माहिती प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आतापर्यंत ओडिशातून ५ लाख, तर पश्चिम बंगालमधून १,५८,६४० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे राज्यांच्या प्रशासनाला कळवण्यात आल्याचेही प्रधान म्हणाले. मागील सर्व वादळांच्या अनुभवानुसार, आम्ही एनडीआरएफच्या पथकांना झाडे कापण्याची यंत्रे, पोलादी खांब कापण्याची यंत्रे उपलब्ध करून दिली असल्याचेही प्रधान म्हणाले.

कोविड-१९ च्या दृष्टीने विचार करून आम्ही अम्फान महाचक्रीवादळाशी लढण्याची तयारी केलेली आहे. कोविड-१९ चा विचार करूनच आपत्कालीन व्यवस्थापन केले जाईल. त्याच प्रमाणे हेलिकॉप्टरद्वारे मदतकार्य करता यावे यासाठी २४ अतिरिक्त पथकेही तयार ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती प्रधान यांनी दिली. या बरोबरच, रस्ते मोकळे करण्याचे कामही सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.

अम्फान हे महाचक्रीवादळ आज बुधवारी दुपारी २.३० वाजता ओडिसाच्या भूमीवर येऊन धडकले आणि ते ४ तास भूमीवर घोंघावत राहणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या