24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रअमरावतीत आंतरधर्मीय विवाह प्रकरण तापले ; खासदार नवनीत राणा पोलिस ठाण्यात आक्रमक

अमरावतीत आंतरधर्मीय विवाह प्रकरण तापले ; खासदार नवनीत राणा पोलिस ठाण्यात आक्रमक

एकमत ऑनलाईन

अमरावती : अमरावती शहरात आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाली आहे. एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली.

लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी कांदे बटाटे विक्री करणा-या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवनीत राणा यांनी म्हटले आहे की, पतीने मुलीला डांबून ठेवले असल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले होते.

मात्र मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला, तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला. या मुद्द्यावर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील पोलिस ठाण्यात धडकल्या. यादरम्यान पोलिस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झाला. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण असून मोठ्या संख्येने गर्दी पोलिस ठाण्यात झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या