मुंबई : बॉलिवूडमधील बहुचर्चित सिनेमा ‘ब्रह्मास्त्र भाग १ शिवा ’ चे ट्रेलर धुमधडाक्यात आज प्रदर्शित झाले. या ट्रेलरला काहीच तासांत दहा लाखांहून जास्त व् ूज मिळाले आहेत. सर्वत्र या ट्रेलरचे कौतुक होताना दिसत आहे. अशातच, मराठी सिनेसृष्टीची सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेदेखील ‘ब्रह्मास्त्र भाग १ शिवा’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले. मात्र, तिच्या कमेंटमुळे ती सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.
अमृताची ही कमेंट पाहून युजर्स भलतेच भडकले आहेत. ‘इतकं पण ओव्हर रिऍक्ट करू नकोस. इतका पण काही छान नाहीये, तुला सुद्धा हे माहीत आहे,’ असे एका युजरने तिची कमेंट पाहून म्हटले आहे.
तर दुस-या बाजूला, या चित्रपटाचा ट्रेलर खरंच चांगला आहे. हॉलिवूडच्या चित्रपटांना जसे आपण प्रोत्साहन देतो तसे बॉलिवूडच्या चित्रपटांनाही द्यायला हवं, अशा शब्दांत नेटक-यांनी अमृताची बाजू घेतली आहे.
‘राझी’ या चित्रपटात अमृता खानविलकरने आलिया भट्टसोबत काम केले आहे. आलियाची ती फॅन आहे. आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाचंही अमृताने असंच कौतुक केलं होतं.