22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रपंढरपूरला जाणा-या वारक-यांच्या ट्रकला अपघात

पंढरपूरला जाणा-या वारक-यांच्या ट्रकला अपघात

एकमत ऑनलाईन

ट्रक पलटी होऊन तब्बल ३० वारकरी जखमी, रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अपघात
सांगली : पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणा-या वारक-यांच्याा ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे घडली आहे. ज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातले एक-दोन नाही तर तब्बल ३० वारकरी जखमी झाले आहेत. त्यापैकी नऊ जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे. त्या सर्वांना कवठेमहांकाळच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील शिरहट्टी येथील सुमारे ५० वारकरी पंढरपूर येथे देवदर्शनासाठी शुक्रवारी निघाले होते. एका ट्रकमधून जाणा-या या वारक-यांच्या गाडीचा कवठेमहांकाळ तालुक्यातल्या विठ्ठलवाडी येथील रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अपघात झाला आहे. भरधाव असणा-या ट्रक चालकाला महामार्गावर काही ठिकाणी काम चालू असल्याने पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव ट्रक समोर असणा-या एसटीला जाऊन धडकला.

त्यानंतर चालकाने जोरात ब्रेक दाबल्याने रस्त्यातल्या खड्ड्यातून ट्रक पलटी झाली. यामध्ये सुमारे ३० वारकरी गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याचबरोबर या ठिकाणी असणा-या ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य करत रुग्णवाहिकेला पाचारण करत जखमींना कवठेमहांकाळच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर या जखमींपैकी नऊ जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या