23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeऔरंगाबादनामांतराच्या लढ्यासाठी वकिलांची फौज उभी करणार

नामांतराच्या लढ्यासाठी वकिलांची फौज उभी करणार

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

मात्र या निर्णयाला एमआयएमने विरोध केला आहे. तर या निर्णयानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी रात्री महत्त्वाच्या पदाधिका-यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. सोबतच कायदेशीर लढाई लढण्यासाठी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहनसुद्धा केले.

जलील औरंगाबादच्या दारू सलाम येथील कार्यालयात कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या बैठकीत बोलताना म्हणाले की, औरंगाबादमध्ये येऊन विकासाच्या मुद्यावर बोलणारे उद्धव ठाकरे सत्ता जात असल्याचे कळताच औरंगाबादचे नाव बदलून गेले.

तर नामांतराचे श्रेय आपल्याला मिळावे म्हणून उद्धव ठाकरे यांनी जाता-जाता हा निर्णय घेतला असून, त्यांना संभाजीराजांबद्दल कोणतेही प्रेम नसल्याचे जलील म्हणाले. तसेच या निर्णयाला विरोध करण्यासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरू आणि न्यायालयीन लढाईसाठी वकिलांची फौज उभा करणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला आहे. सोबतच लोकसभेत सुद्धा आपण हा मुद्दा मांडणार असल्याचे जलील म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या