21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्र३ ऑगस्टला झाला होता घातपाताचा प्रयत्न; मेटेंच्या निधनाबाबत धक्कादायक खुलासा

३ ऑगस्टला झाला होता घातपाताचा प्रयत्न; मेटेंच्या निधनाबाबत धक्कादायक खुलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे याच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या गाडीचा खरंच अपघात झाला की घातपात याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. अशातच बीड येथील शिवसंग्रामच्या पदाधिका-यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. मेटे यांच्या गाडीचा ३ ऑगस्टलादेखील घातपाताचा प्रयत्न झाला होता.

बीडहून पुण्याकडे जात असताना शिक्रापूरजवळ दोन गाड्यांनी मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला होता असा खुलासा बीड येथील पदाधिकारी अण्णासाहेब माळकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर मेटेंच्या गाडीचा खरंच अपघात झाला की घातपात झाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

माळकर म्हणाले की, मेटे तीन ऑगस्टला बीडहून पुण्याला जात होते त्यावेळीदेखील शिक्रापूरजवळ दोन गाड्यांनी मेटे यांच्या गाडीचा पाठलाग केला होता. तसेच या गाडीने आमच्या गाडीला कट मारण्याचादेखील प्रयत्न केला होता. या घटनेवेळी आपण स्वत: त्यांच्यासोबत होतो. आयशर गाडी आपला वारंवार पाठलाग करत असल्याचे आपण मेटेंना सांगितल्याचेही ते म्हणाले.

त्यावेळी संबंधित गाडीचा चालक नशेत असेल त्यामुळे तो वारंवार पाठलाग करत असेल असे मेटे साहेब म्हणाले होते. त्यामुळे १४ तारखेला पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातदेखील पाठलाग करणारी गाडी असेल तर, नक्कीच हा घातपातच असण्याची शक्यता असून, असे असल्यास आम्ही शांत बसणार नाही, असे माळकर यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या