26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयदेशात ध्रुवीकरणाचे वातावरण निर्माण केले जात आहे

देशात ध्रुवीकरणाचे वातावरण निर्माण केले जात आहे

एकमत ऑनलाईन

उदयपूर : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या चिंतन शिबीरात हजेरी लावली असून पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये तीन दिवस हे चिंतन असणार आहेत. यावेळी सोनिया गांधी यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात ध्रुवीकरणाचे वातावरण आणि भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी सोनिया गांधींनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहका-यांनी दिलेल्या ‘कमाल प्रशासन, किमान सरकार’ या घोषणेचा अर्थ वेदनादायीपणे स्पष्ट झाला आहे. याचा अर्थ देशाला सतत ध्रुवीकरणाच्या स्थितीत ठेवणे तसेच लोकांना नेहमी भीती आणि असुरक्षित स्थितीत राहण्यात भाग पाडणे आहे. याशिवाय समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या आणि समान नागरिक असलेल्या अल्पसंख्याकांना अत्याचारित आणि अनेकदा क्रूरपणे लक्ष्य केले जात आहे, असा आरोप सोनिया गांधींनी केला.

नवसंकल्प चिंतन शिबीरच्या निमित्ताने भाजप, आरएसएस आणि त्यांच्या सहका-यांमुळे देशासमोर निर्माण झालेल्या अनेक आव्हानांवर चर्चा करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याचे यावेळी सोनिया गांधींनी म्हटले आहे.
काँग्रेसचे चिंतन शिबीर १३, १४ आणि १५ मे असे तीन दिवस चालणार आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीआधी पक्षाला मजबूत करणे यामागचा मुख्य उद्धेश आहे.

शुक्रवारी चिंतन शिबीरामध्ये मार्गदर्शन करताना सोनिया गांधींनी राष्ट्रीय तसेच अर्थपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्याची ही संधी आहे असे सांगितले. यावेळी सोनिया गांधींनी संस्थेत बदल गरजेचे असून आपण आपल्या कामाची पद्धत बदलली पाहिजे असे स्पष्ट मत मांडले. आपल्या वैयक्तिक अपेक्षांपेक्षा संस्थेला वरती ठेवले पाहिजे. पक्षाने आपल्याला भरपूर काही दिले असून आता परतफेड करण्याची वेळ आहे, असे सोनिया गांधींनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या