28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राचे आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राचे आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्राला सीरियस मुख्यमंत्र्यांची गरज आहे. वेळ पडली तर दोन मुख्यमंत्री नेमा, असा उपहासात्मक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. तसेच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेऊन महाराष्ट्राचे आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावरून सरकारवर निशाणा साधला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी सगळ्या मंडळांमध्ये जावे, सगळं साजरं करावं. म्हणून मी सातत्याने म्हणते की महाराष्ट्राला सीरियस, फोकस्ड मुख्यमंत्र्यांची गरज आहे. वेळ पडली तर या सरकारने दोन मुख्यमंत्री नेमावे, एकाने जरूर यात्रेवर जावे आणि एकाने राज्य चालवावे, म्हणजे आता जे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे ते होणार नाही. कारण हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. या प्रकल्पामुळे लाखो नोक-या मिळणार होत्या. असे काय घडले की आपल्या हातातील घास काढून घेण्यात आला? असा सवालही त्यांनी विचारला.

‘महाराष्ट्राच्या विरोधात केंद्र सरकारचा कट’
फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेऊन महाराष्ट्र, मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या विरोधात हा कट करत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.

‘शिंदे गटाचे सगळे निर्णय दिल्लीतून होतात’
शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘छत्रपतींचं नाव घेऊन हे सरकार सत्तेत आलं. पण छत्रपती कधी दिल्लीसमोर झुकले नाहीत. हे सरकार सातत्याने दिल्ली म्हणेल तेच करते. दुर्दैवाची गोष्ट ही आहे जी शिवसेना, ज्याकडे भाजप यायचा, आता शिंदे गटाचे सगळे निर्णय दिल्लीतून होतात. काहीतरी नवे कल्चर महाराष्ट्रात येतेय. हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे आणि आपल्या इकॉनॉमीसाठी हानिकारक आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या