भारत आणि चीनच्या दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये तणावपूर्ण स्थिती झाली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहेत. लडाख जवळ लाइन ऑफ एक्च्युअल कंट्रोल (एलएसी) वर भारत विमाने उतरवण्यासाठी इमर्जन्सी धावपट्टी तयार करत आहे. शिवाय चिनी सैन्याला रोखण्यासाठी बोफोर्स तैनात केले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ (NH-44) वर विमाने उतरवण्यासाठी इमर्जन्सी धावपट्टीच्या कामाला सुरुवात झाली आहे. कारण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ विमानेआणि इतर विमाने उतरण्यासाठी ही धावपट्टी तयार केली जात आहे. चीन देखील LAC जवळ अनेक गोष्टींचा पुरवठा करत आहेत. त्यामुळे दुसरीकडे भारताने ६० बोफोर्स तैनात करण्यात केल्या आहेत.
Read More गर्भवती हत्तीणीचा मृत्यूप्रकरणी मनेका गांधी संतापल्या
इमर्जन्सी धावपट्टी तयार झाल्यास भारताची लढाऊ विमाने ड्रॅगनच्या नाकाखील उतरतील आणि नाकाखालूनच उडतील. दक्षिण काश्मीरमधल्या बिज्बेहरा भागात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ही धावपट्टी तयार केली जात आहे. ३ किलोमीटर इतक्या लांबीची ही धावपट्टी असेल. चीनसोबतच्या तणावानंतर दोन दिवसांपूर्वीच या धावपट्टीचं काम सुरू झाले आहे.
चिनी सैन्य लडाखच्या सीमावर्ती भागात शिरजोरी करण्याचा प्रयत्न करत असेल तरी भारतीय लष्काराचे जवान देखील त्यांच्यासमोर उभे ठाकलेयत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये सध्या चर्चा जरी सुरू असली तरी अद्याप हा वाद संपलेला नाही आहे. या संदर्भात दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जर्नल रँकच्या अधिकाऱ्यांची ६ जूनला बैठक होणार आहे.