24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रराष्ट्रगीत सुरू असतानाच माजी सैनिकाचा मृत्यू

राष्ट्रगीत सुरू असतानाच माजी सैनिकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नाशिक : राष्ट्रगीत सुरू असतानाच माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे. चंद्रभान मालुंजकर असे मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात राष्ट्रगीत सुरू असताना मालुंजकर जमिनीवर कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

देशभरात सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने नाशिक शहरातील सातपूर परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात येत होती. राष्ट्रगीतासाठी सर्व मान्यवर उभे होते. राष्ट्रगीत सुरू असताना अचानक उपस्थित माजी सैनिक जमिनीवर कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

सातपूर परिसरातील संदीप नगरे येथील खासगी शाळेत ‘आजादी का अमृतमहोत्सव’ निमित्त आयोजित कार्यक्रमात माजी सैनिक चंद्रकांत मालुंजकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. राष्ट्रगीत सुरू असतानाच मालुंजकर यांना अस्वस्थ वाटू लागले. राष्ट्रगीत संपताच ते चक्कर येऊन पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णाला दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मालुंजकर हे १९६२ च्या युद्धात सहभागी होते.

स्टेजवरच मृत्यू
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी राष्ट्रगीत सुरू असताना स्टेजवर उभे असलेल्या चंद्रकांत मालुंजकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते स्टेजवरच कोसळले. यातच त्यांचे निधन झाले.

निवृत्तीनंतर अनेक उपक्रम
चंद्रभान मालुंजकर यांनी निवृत्तीनंतर सातपूर परिसरात माजी सैनिक संघटनांच्या माध्यमातून नवतरुणांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. परिसरातील कोणत्याही कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती असायची. मालुंजकर यांच्या मृत्यूमुळे नाशिक जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या मृ्त्यूने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. चंद्रभान मालुंजकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या