21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांच्या जिवास धोका

ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांच्या जिवास धोका

एकमत ऑनलाईन

पुणे: ब्राह्मण महासंघाचे नेते आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवास धोका असल्याची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना कळवली आहे. याबाबत केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिका-यांनी दवे यांची भेट घेऊन त्यांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर दवे यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना याबाबत कळवले असून, उदयपूरप्रमाणे पुण्यात काही घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, याबाबत दवे म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणेने माझ्या जिवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. याबाबतच्या काही सूचना त्यांनी दिल्या असून, पोलिस संरक्षणाची मागणी करा असे सांगितले.
त्याप्रमाणे पुणे पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त यांना अर्ज करून पोलिस संरक्षण तात्काळ मिळावे अशी मागणी केली आहे.

संजय राऊतांचे ट्विट
दवे म्हणाले की, मुस्लिम मूलत्ववादी संघटनांच्या रडारवर माझे नाव आले आहे. मात्र, अशाप्रकारच्या धमक्या आल्या तरी माझे नियतीने सोपवलेले कार्य मी एक क्षणभरसुद्धा थांबवणार नाही. देव, देश, धर्म यासाठीचे माझे जीवन आहे. दुसरीकडे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही मंगळवारी ट्विट करत दवे यांच्या जिवास धोका असल्याचे म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या