24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeअन् ७३ वर्षांपूर्वी गंजगोलाईत तिरंगा फडकला

अन् ७३ वर्षांपूर्वी गंजगोलाईत तिरंगा फडकला

एकमत ऑनलाईन

लातूर (एजाज शेख) : विविध संस्थांनांमध्ये विखुरलेला आपला भारत देश दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला आणि ५६५ पैकी ५६२ संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली. मात्र हैदराबाद, काश्मिर व जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झालेली नव्हती. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठवाड्यात मुक्तिसंग्राम सुरु झाला. एक वर्ष, एक महिना दोन दिवस चाललेल्या या मुक्तिसंग्रामाच्या धगधगत्या चैतन्यकुंडाने निजामी राजवटीचा अंत झाला. असफिया झेंडा काढून विलक्षण धाडसाने तिरंगा फडकवणा-या लातूरच्या ‘त्या’ सहा विरांना सलाम.

असफिया घराण्याच्या निजामी राजवटीच्या जोखडातून मराठवाड्यातील जनता १९४८ च्या सप्टेंबर महिन्यात स्वतंत्र झाली. या मुक्ततेचा आज १७ सप्टेंबर २०२१ रोजी ७३ वा स्मृतीदिन साजरा करीत आहोत. सन १७२४ ते १९४७ ही सव्वादोनशे वर्षांची निजामी राजवट संपविण्यासाठी जे-जे हुतात्मे झाले त्यांना या निमित्ताने अभिवादन. रजाकाराच्या अत्याचाराविरुद्धचा असंतोष म्हणजे हा लढा जनतेचा अन् रझाकारी दांडगाईचा होता. काळाने या संघर्षाला गती दिली व निजामाच्या विरोधात संघर्षाचा वणवा मराठवाड्यातील गावो-गावी पेटला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देविसिंग चव्हाण, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे, काशिनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, जनार्दन होर्टीकर, सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, देवराव कवळे, जीवनराव बोधनकर, श्रीधर वर्तक, जानकीलाल राठी, शंकरराव जाधव, जर्नादन मामा, किशनसिंग राजपूत, गोविंदराव पानसरे, चंद्रशेखर बाजपाई, बहिर्जी बापटीकर, राजभाऊ वाकड, विश्वनाथ भिसे, जयंतराव पाटील, हरिश्चंद्र जाधव, शामराव शिवणगीकर ही सर्व मंडळी पेटून उठली. मराठवाडा मुक्तीच्या धगधगत्या चैतन्यकुंडात लातूरच्या मंडळींनेही स्वत: ला झोकुन दिले. होते.

सन १९४२ च्या धगधगत्या काळात लातूरच्या गंजगोलाईतील टॉवरवरचा निजामाचा असफिया झेंडा काढून तेथे विलक्षण धाडसाने तिरंगा फडकविणा-या करबसअप्पा इंडे, गुरुसंगय्या स्वामी, अनंतराव जैन, काशिनाथ भोई, शामराव उमाटे, रघुविर शिंदे या सहा विरांना कधीही विसरता येणार नाह.ी लातूरचे आझाद चौक तर स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रच होते.

चौदाघर मठ आणि पाचशेघर मठ येथे स्वातंत्र्याच्या आकांक्षेने पेटून उठलेल्या हजारो तरुणांचे प्रबोधन चालत असे. या संग्रामात दिगंबराव शिवणगीकर, गुरुबसअप्पा टेंकाळे, राघवेंद्रराव दिवाण, किसनराव अयाचित, रामचंद्रराव मंत्री, विश्वनाथअप्पा सोलापूरे, दासराव बोकील हे त्याकाळचे गावकारभारी होते. या हुतात्म्यांनी आपले आयुष्य ज्या कारणांसाठी वेचले त्याची जाणिव ठेवून मराठवाडा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक, अशा सर्वांगाने सदैव पुढे जावा, यासाठी कटिबद्ध होऊ या.

४मराठवाडा मुक्ती संग्रामातील आपल्या सहकार्यांना स्वामी रामानंद तीर्थ आवेशपुर्ण मार्गदर्शन करीत असायचे. दुस-या छायाचित्रात निजामाच्या जोखडातून लातूर शहर मुक्त करण्यासाठी रणगाड्यांसह मेजर जनरल जे. एन. चौधरी यांचे सन १९४८ च्या सप्टेंबरमध्ये लातूरात आगमन झाले. त्या एैतिहासिक क्षणी त्यांच्यासमवेत स्व. चंद्रशेखर बाजपाई, स्व. मदनलाल जोशी, स्व. जयनारायण चांडक, स्व. हिरालाल जोशी, स्व. कस्तुरचंद रघूनाथ, स्व. शंकरदेव अष्टूरे आदी.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या