27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुख गैरहजर, चांदिवाल आयोगाची नाराजी

अनिल देशमुख गैरहजर, चांदिवाल आयोगाची नाराजी

एकमत ऑनलाईन

मुंबई : १०० कोटी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांदिवाल आयोग सुनावणी करता आजही हजर राहिले नाहीत. त्यामुळे आजही काहीच काम होऊ न शकल्याने आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
कोरोनाच्या संसर्गामुळे ऑर्थर रोड तुरुंग प्रशासनाने देशमुखांना बाहेर सोडण्यास मनाई केली आहे, तर दुसरीकडे तळोजा कारागृहातून सचिन वाझे नियमित चौकशीला हजर राहत आहेत. त्यामुळे आमचा आदेश आर्थर रोड जेल प्रशासन मानत नाही का, असा सवाल चांदिवाल आयोगाने उपस्थितीत केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज चांदिवाल आयोगासमोर हजर न झाल्याने आजचे कामकाज तहकूब करण्यात आले. अनिल देशमुख यांच्यासोबतच संजीव पालांडेलादेखील ऑर्थर रोड जेलमधून सुनावणीसाठी आणण्यात येते. मात्र, त्यांनादेखील सुनावणी करता आणण्यात आले नाही. याचे कारण म्हणजे ऑर्थर रोड जेलमधील कैदी सुनावणी करता बाहेर जातात, त्यावेळेस त्यांना कोरोनाची लागण होते. हे समोर आले.

जर कोरोना ऑर्थररोड जेलमध्ये वेगाने पसरला तर हाहा:कार होईल. या आधीच क्षमतेपेक्षा दुप्पट संख्येने ऑर्थररोड जेलमध्ये कैदी आहेत. अशातच सध्या कोविडमुळे जेलमधील कर्मचा-यांची संख्यादेखील कमी आहे. शिवाय जेलच्या आत कोरोना नियम पाळणे अवघड होत असल्याने जेल बाहेर कैदी गेले नाही, तरच योग्य राहिल, असे स्पष्टीकरण जेल प्रशासनाकडून देण्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या