मुंबई : अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अटकेत असलेला बुकी अनिल जयसिंघानीला अटक केल्यानंतर पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. बुकी अनिल जयसिंघानी याचे १५ हजार कोटींचे मॅच फिक्सिंग नेटवर्क पोलीस तपासात उघड झाले आहे.
या रॅकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू, आयपीएल फ्रँचाईसी, मालक आणि पोलिसांचा समावेश असल्याचीही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासाला पोलिसांकडून वेग दिला जात आहे.
भ्रष्टाचार,ब्लॅकमेलिंग, मॅचफिक्सिंग आणि हवालाचे मोठे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. पाकिस्तान आणि दुबईतील क्रिकेट बेटिंग कार्टेलशी संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. एका दूरध्वनी संभाषणात जयसिंघानी रमेश या फरार बुकीला मुंबई आणि ठाण्यात क्रिकेट बेटिंग करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे समोर आले.
या संभाषणात त्याने माझे स्वत:चे ठाणे आणि शिर्डी येथे थ्रीस्टार हॉटेल आहे. स्थानिक पोलिसांशी माझे चांगले संबंध आहेत आणि सुरक्षेसाठी दोन शस्त्रधारी गार्ड पण उपलब्ध करुन देतो असे त्याने संभाषणात म्हटले असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जयसिंघानीने सनी हे कोडनाव वापरायचा. आणखी एक बुकी किरण हा मेट्रो नावाने एक बेंिटग बुक चालवतोय. ही बेटिंग पोलिस संरक्षणात सुरू असल्याचेही त्याने संभाषणात म्हटले. या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज जयंिसघानीचाच असल्याची पुष्टी मुंबई पोलिसांनी केली आहे. अनिल जयंिसघानी हा ५ राज्यांत १७ गुन्ह्यांमध्ये वाँटेड गुन्हेगार आहे.