ब्राझीलिया : ब्राझील हा कोंबडीच्या मांसाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. दरवर्षी ते १०अब्ज डॉलर किमतीचे कोंबडीचे मांस निर्यात करतो. बर्ड फ्लूची काही प्रकरणे समोर आल्यानंतर ब्राझीलमध्ये सहा महिन्यांची पशु आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ब्राझीलमधील एस्पिरिटो सँटो राज्यात बर्ड फ्लूचे सात रुग्ण आढळले आहेत. एच५एन१ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने आरोग्य आणीबाणी लागू केली आहे. हा संसर्गजन्य आजार आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ऑक्टोबर २०२१ पासून, बर्ड फ्लूची गंभीर प्रकरणे जगभरात नोंदवली गेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. काही सस्तन प्राण्यांमध्येही संसर्गाची प्रकरणे आढळून आली आहेत.
जेव्हा एखाद्या देशाच्या प्राण्यांमध्ये किंवा त्याच्या सीमेबाहेरून येणाऱ्या प्राण्यांमध्ये संसर्गजन्य रोगाचा झपाट्याने प्रसार होतो तेव्हा पशु आरोग्य आणीबाणी घोषित केली जाते. हा आजार पुढे पसरू नये म्हणून आणीबाणी लागू करण्यात आली आहे. अनेक वेळा कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे आढळून आल्यानंतर त्या मोठ्या प्रमाणात दगावल्या जातात. मासे आणि प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांमध्ये संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्राणी आरोग्य आणीबाणी घोषित केली जाते.