23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयप्रशांत किशोर यांची पदयात्रेची घोषणा

प्रशांत किशोर यांची पदयात्रेची घोषणा

एकमत ऑनलाईन

पाटणा : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषदेमध्ये महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवसापासून बिहारमधील चंपारण्य येथून तीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढणार असल्याचे जाहीर केले. प्रशांत किशोर यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा करणार नसल्याचे म्हटले. पत्रकार परिषदेत प्रशांत किशोर यांनी बिहारच्या विकासाबद्दल अधिक भाष्य केले.
प्रशांत किशोर यांनी गेल्या तीन दशकांपासून बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांची सत्ता होती, असे म्हटले. पहिल्या १५ वर्षांत लालू प्रसाद यादव आणि दुस-या १५ वर्षांमध्ये नितीश कुमार यांची सत्ता आहे. लालू प्रसाद यादव यांनी सामाजिक न्यायाला प्राधान्य देत सरकार चालवले. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास व्यक्तींच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. तर, नितीश कुमार यांचे समर्थक आमच्या काळात आर्थिक विकास आणि सामाजिक प्रश्नांवर काम झाल्याचे म्हणतात, असे प्रशांत किशोर म्हणाले.
लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार समर्थकांच्या दाव्यात तथ्य असले तरी बिहार गेल्या ३० वर्षांपासून देशातील सर्वांत मागास राज्य राहिले आहे. विकासाच्या मापदंडावर बिहार मागे राहिला आहे. गेल्या १५ वर्षांतील बिहारमधील प्रगतीचा वेग बघितला तर आपण याद्वारे विकासाच्या मार्गावर जाऊ शकत नाही. देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये बिहारचा समावेश व्हायचा असल्यास राज्याला नव्या विचाराची, नव्या प्रयत्नांची गरज असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.

बिहारच्या विकासासाठी नवा विचार करण्याची क्षमता एका व्यक्तीकडे आहे. बिहारच्या जनतेने त्या व्यक्तीसोबत मिळून प्रयत्न केले नाहीत तर बिहारचे प्रश्न सुटणार नाहीत. बिहारचे प्रश्न समजणारे, लोकांमध्ये जाऊन काम करणारे लोक, बिहार बदलण्याची इच्छा असणा-या लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत, असे प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांनी माध्यमांमध्ये राजकीय पक्षाची घोषणा करण्याचा अंदाज व्यक्त केला होता, पण त्यासंदर्भात घोषणा करणार नसल्याचे ते म्हणाले. जर पक्षाची स्थापना केली तर त्यामध्ये सर्वांचे योगदान असेल. २ ऑक्टोबरपासून पदयात्रा सुरू करणार आहे. मी वैयक्तिकरीत्या ३ हजार कि.मी.ची यात्रा करणार असल्याचे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या