26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रव्हॅट कमी करण्याची घोषणा कागदावरच

व्हॅट कमी करण्याची घोषणा कागदावरच

एकमत ऑनलाईन

मुंबई : महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर काल राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली. परंतु इंधन दरकपातीसंदर्भातील राज्य सरकारची घोषणा अद्याप कागदावरच असून, कर कपातीचा अध्यादेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकार महागाईबाबत गंभीर नसल्याचा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी केले आहे.

राज्य सरकारकडून काल पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु राज्याच्या अर्थमंत्रालयाकडून करकपातीचा अध्यादेश अद्यापही जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील जनतेला जो काही दिलासा मिळणे अपक्षित होते, तो अद्यापही मिळालेला नाही.

फडणवीस म्हणाले की, राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती प्रसारित केली. मात्र, प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. मविआने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही. केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम असल्याचे ते म्हणाले. काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचेसुद्धा श्रेय घ्यायचे, हे गंभीर असल्याचे मत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या