22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेचा आणखी एक आमदार ‘नॉट रिचेबल’

शिवसेनेचा आणखी एक आमदार ‘नॉट रिचेबल’

एकमत ऑनलाईन

मुंबई :शिवसेनेचा आणखी एक आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार रवींद्र वायकर नॉट रिचेबल आहेत. रवींद्र वायकर शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे.

आधीच राज्याच्या राजकारणात अस्थिर परिस्थिती असून शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार पडले आहे. एकनाथ शिंदे गटामुळे शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यामुळे गेलेली सत्ता उद्धव ठाकरेंच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.

यातच आता पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार वायकर नॉट रिचेबल असल्याने ते नेमके कुठे गेले, हे कळायला मार्ग नाही. दरम्यान, यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का बसला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या