23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयअल्पसंख्याकविरोधी प्रतिमा देशासाठी घातक

अल्पसंख्याकविरोधी प्रतिमा देशासाठी घातक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात विविध राज्यांमध्ये अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात असल्याच्या घटना घडत असतानाच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एक गंभीर विधान केले आहे. या घटनांचा भारतीय कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो असा इशारा रघुराम राजन यांनी दिला आहे. यामुळे भारतीय उत्पादनांची बाजारपेठ कमी होईल आणि भारतावरचा परदेशी सरकारांचा विश्वास उडेल असे राजन यांनी सांगितले आहे.

दिल्लीतल्या जहाँगीरपुरी या भागातल्या मशिदीच्या आसपासची दुकाने, घरे बुल्डोझरच्या साहाय्याने पाडण्यात आली. सांप्रदायिक हिंसाचाराची घटना घडली. याच पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांच्या या विधानाने लक्ष वेधले आहे. टाईम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना राजन म्हणाले जर आपल्याकडे सर्व नागरिकांना तसंच गरीब राष्ट्रांनाही समान वागणूक देणारे लोकशाही राष्ट्र म्हणून पाहिले गेले तर आपण अधिक सहानुभुतीशील ठरू. ग्राहक म्हणतील की हे राष्ट्र काहीतरी चांगले करायचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या राष्ट्राकडून वस्तू खरÞेदी करेन.

आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम?
राजन पुढे म्हणाले, फक्त ग्राहकच अशा पद्धतीने विचार करत नाहीत की कोणाला आपण पाठिंबा द्यायचा. पण आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दलही अशा दृष्टिकोनातून विचार होतो. एखादा देश अल्पसंख्यांकांना कशी वागणूक देतो यावर हा देश विश्वास ठेवण्या योग्य आहे की नाही याबद्दल सरकारे विचार करतात आणि निर्णय घेतात.

चीनलाही परिणाम भोगावे लागले
राजन पुढे म्हणाले, चीनलाही अशा प्रकारच्या प्रतिमेमुळे समस्यांचा सामना करावा लागत आहे. उईघुर आणि तिबेटियन लोकांसोबतच्या वागणुकीमुळे चीनच्या प्रतिमेवरही परिणाम झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या