Thursday, September 28, 2023

अनुष्काने विराटची चांगलीच खेचली

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एका प्रमोशनच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी पत्नी अनुष्का शर्माने विराट कोहलीची चांगलीच खेचली. विराट कोहलीने आयपीएलच्या १६ व्या हंगामात आपल्या धडाकेबाज फलंदाजी आणि मैदानावरील उत्साहपूर्ण वर्तनाने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. विराट कोहलीचे अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

विराटच्या याच व्हायरल व्हीडीओचा आधार घेत चॅट शोमध्ये अनुष्काला विराट कोहलीला स्लेज करण्यास सांगण्यात आले. तिने अत्यंत खुबीने स्लेज केले. यावेळी अनुष्का ही विकेट किपर झाली होती. अनुष्का म्हणाली की, आज २४ एप्रिल आहे. आज तरी धावा कर कोहली. विराट कोहलीने देखील याला लगेचच प्रत्युत्तर दिले यानंतर सर्व प्रेक्षक हसू लागले. विराट म्हणाला, तुझ्या संघाने एप्रिल, मे, जून, जुलै महिने मिळून जेवढ्या धावा केल्या नसतील तेवढे सामने मी खेळले आहेत.

अनुष्काला विराटचे विकेटनंतरचे सेलिब्रेशन करण्यास सांगितले. अनुष्काने देखील विराटची नक्कल केली. अनुष्का स्टेजच्या भोवतीने धावत विराट करतो तसे सेलिब्रेशन करत होती. त्यावेळी विराटला हसू आवरले नाही. विराट याबाबत म्हणाला की, या सर्व गोष्टी भावनेच्या भरात होतात. हे सारखे सारखे दाखवत जाऊ नका मला खूप लाज वाटते.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या