नवी दिल्ली : जालन्यातील शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकरांनी आज भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. माणूस संकटात असताना कधीही सेफ होण्याचा प्रयत्न करत असतो, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. दानवे यांच्या भेटीनंतर त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.
काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान दानवेंनी आज मला चहापाण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो होतो पण आमच्या भेटीचा कोणीही गैरअर्थ घेऊ नये. मी दिल्लीत का आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे,
माणसांच्या काही अडचणी असतात, कौटुंबिक असो किंवा कोणतीही असो. तोच ताण तुम्हाला माझ्या चेह-यावर दिसत आहे. नाही त्या गोष्टीमध्ये माणसांना अडचणी निर्माण केल्या जातात. माणूस अडचणीत असेल तर तो सेफ व्हायचा प्रयत्न करत असतो. असे मत अर्जुन खोतकरांनी दिल्लीत व्यक्त केले आहे.