लुंबिनी : नेपाळशिवाय आपला रामदेखील अपूर्ण आहे. भारतात राम मंदिर बांधले जात असेल तर नेपाळच्या लोकांनाही आनंद होईल. हजारो वर्षांपासून भारतातील लोकांनी श्रद्धेने पाहिले आहे. हा देश आपली संस्कृती जपणार आहे. आमचा सामायिक वारसा, संस्कृती आणि प्रेम आहे. हे आमचे भांडवल आहे. ते जितके मजबूत असेल तितकेच आपण बुद्धाचा संदेश जगापर्यंत पोहोचवू शकतो, असे महात्मा बुद्धांचे जन्मस्थान असलेल्या लुंबिनीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
बुद्ध हे ज्ञानही आहेत आणि संशोधनही आहे. ते विचार आहेत तसेच संस्कारही आहेत. बुद्ध हे देखील विशेष आहेत कारण त्यांनी केवळ उपदेशच केला नाही तर मानवतेला प्रबोधनही केले. ते नक्कीच सामान्य मूल म्हणून जन्माला आले नव्हते. प्राप्तीपेक्षा त्याग महत्त्वाचा आहे याची जाणीव त्यांनी करून दिली. म्हणून त्यांनी जंगलात भटकंती केली, तपश्चर्या केली आणि संशोधन केले, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
बुुद्धांनी सांगितले होते की, स्वत:चा दिवा बना. माझे विचारही विचारपूर्वक आत्मसात करा. बुद्धांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला आणि या दिवशी त्यांना बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यानंतर या तारखेला त्यांना निर्वाण मिळाले. तो निव्वळ योगायोग नव्हता. ही मानवी जीवनाची परिपूर्णता आहे. पौर्णिमा हे परिपूर्णतेचे प्रतीक आहे. बुद्ध हे भौगोलिक सीमांच्या वर उठून सर्वांचे आहेत आणि सर्वांसाठी आहेत. भगवान बुद्धांशी माझेही नाते आहे. यातही एक अद्भुत आणि आनंदी योगायोग आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
जन्मगाव बौद्ध शिक्षणाचे केंद्र होते
जिथे माझा जन्म (वडनगर) झाला, ते प्राचीन काळात बौद्ध शिक्षणाचे प्रमुख केंद्र होते. तेथे अजूनही मोठे अवशेष सापडत आहेत. भारतात अशी अनेक शहरे आहेत, जिथे लोक त्यांना त्या राज्याची काशी म्हणून ओळखतात. काशीजवळील सारनाथशी असलेले माझे नाते तुम्हालाही माहीत आहे. हा वारसा आपल्याला मिळून समृद्ध करायचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.