27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रपोलिसांची माफी माग, नाहीतर तुला सोडणार नाही ; नवनीत राणांना पोलिस पत्नीचा...

पोलिसांची माफी माग, नाहीतर तुला सोडणार नाही ; नवनीत राणांना पोलिस पत्नीचा इशारा

एकमत ऑनलाईन

अमरावती : सर्वांची माफी माग, नाहीतर तुला सोडणार नाही, असा इशारा पोलिसाच्या पत्नीने खासदार नवनीत राणा यांना दिला आहे. लव्ह जिहाद झाल्याचा आरोप करत राणा यांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला होता. त्यांची ही आक्रमक भूमिका पाहता पोलिस कुटुंबाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

नवनीत राणा तुला शेवटची संधी देते. तुला खरेच माणुसकी असेल ना, तर सर्व पोलिसांची जाहीरपणे माफी माग. नाहीतर तुला आता मी सोडणार नाही. तू पोलिसांच्या काळजाला हात घातलेला आहेस. रात्रभर कोरोना काळामध्ये पोलिसांनी कर्तव्य पार पाडले. तुला पोलिसांचे दु:ख नाही कळणार. पोलिसांबद्दल अपशब्द तू नेहमीच वापरतेस. आता मात्र त्यांची माफी मागावी लागेल, अन्यथा तुला सोडणार नाही, असा इशारा पोलिस पत्नी वर्षा भोयर यांनी दिला आहे.

दरम्यान लव्ह जिहाद प्रकरणातून अशा मुलींचे अपहरण करून धर्मांतर केले जात आहे, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नवनीत राणा यांनी पोलिसांना फोन केला असता काही मिनिटांनी हा कॉल रेकॉर्ड करण्यात आला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. पोलिसांनी लोकप्रतिनिधींचा फोन कोणत्या अधिकाराखाली रेकॉर्ड केला, असा सवाल करत नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

अमरावतीतील एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने पळवून नेल्याचा आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि खासदार नवनीत राणा यांच्याकडे केला होता. ही मुलगी संध्याकाळपासून गायब होती. मुलीचा भाऊ खासदार राणा यांच्याकडे बुधवारी सकाळी मदत मागण्यासाठी आला.

बुधवारी सकाळी खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांना फोन केला. सदर प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली. यावेळी ठाकरेंनी हा फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या