18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रपैसे घेतल्याच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करतो; रवी राणा

पैसे घेतल्याच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करतो; रवी राणा

एकमत ऑनलाईन

अमरावती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज सकाळी झालेल्या बैठकीनंतर रवी राणा यांनी बच्चू कडूंबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करत बच्चू कडू यांनीदेखील आक्षेपार्ह वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी रवी राणा यांनी केली होती.

आमदार रवी राणा यांनी म्हटले की, शिंदे-फडणवीस हे माझे मार्गदर्शक नेते आहे. वर्षा बंगल्यावर अडीच तास मिंिटग झाली. आमदार बच्चू कडू यांच्या बरोबर वाद होते, काही मतभेद होते ते मिटले. त्यांनीदेखील काही अपशब्द वापरले आहेत. हे शब्द ते देखील मागे घेतील.

आम्ही दोघेही सरकार सोबत आहोत. सरकारबरोबर आम्ही काम करू. माझ्याकडून वादावर पडदा पडला असल्याचेही राणा यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या ५० आमदारांमध्ये त्या वक्तव्याने गैरसमज पसरले असतील अथवा आमदार दुखावले असतील तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे राणा यांनी म्हटले.

मागील काही दिवसांपासून रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. राणा यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतले असल्याचा आरोप केले होता. राणा यांच्या या वक्तव्याने दुखावलेल्या कडू यांनी निर्वाणीचा इशारा देताना राणा यांनी माफी मागावी अथवा सरकारविरोधात भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर, रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात समेटासाठी बैठक झाली. त्यानंतर आज सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा यांची बैठक झाली. त्यानंतर राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मला आता वाद नको, माझे शब्द मागे घेतो – कडूंचा माफीनामा
बच्चु कडूंनी पत्रकार परिषदेत रवी राणा यांची माफी मागितली आहे. यामुळे राणा आणि कडू यांच्या वादावर पडदा पडला आहे. कडु म्हणाले, मी आता माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. राणा यांनी माफी मागितल्याचे मला कळले आहे. त्यामुळे देखील यापुढे वाद नको म्हणून माघार घेतो आहे. माझे शब्द मागे घेतो. यापुढे सामाजिक कामाला प्राधान्य देणार असल्याचे कडू यांनी सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या