26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीय‘पीएम गति शक्ती’ योजनेला मंजुरी

‘पीएम गति शक्ती’ योजनेला मंजुरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनला आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय समितीने मंजुरी दिली आहे. या मास्टर प्लॅनमध्ये मल्टी-मोडल कनेक्­टिव्हिटी प्रदान करण्यासाठी अंमलबजावणी, देखरेख आणि सहाय्यक यंत्रणेसाठी संस्थात्मक चौकटीचा समावेश आहे.

पंतप्रधानांनी १३ ऑक्­टोबर रोजी मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी पीएम गतिशक्ती मास्टर प्लॅनचा प्रारंभ केला होता. अंमलबजावणीच्या चौकटीमध्ये सचिवांचा अधिकार प्राप्त गट, नेटवर्क नियोजन गट आणि आवश्­यक तांत्रिक क्षमता असलेला तांत्रिक सहाय्य विभाग यांचा समावेश आहे. सचिवांच्या गटाच्या अध्यक्षपदी कॅबिनेट सचिव असतील आणि सदस्य म्हणून १८ मंत्रालयांचे सचिव आणि सदस्य निमंत्रक म्हणून लॉजिस्टिक विभाग प्रमुख असतील. विविध कामांच्या समन्वयासाठी कार्यपद्धती आणि रूपरेषा निश्­िचती आणि पायाभूत विकासाचे विविध उपक्रमांचा सामायिक एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम हा सचिवांचा गट करेल. स्टील, कोळसा, खते आदींची विविध मंत्रालयाच्या गरजेनुसार मोठ्या प्रमाणात प्रभावी माल वाहतूक करण्यासाठी आवश्­यक उपाययोजनांकडे सचिवांचा गट लक्ष देईल.

कशाला दिली मंजुरी?
केंद्रीय आर्थिक समितीने नेटवर्क नियोजन गटासाठी स्थापना, रचना आणि संदर्भ अटींना मंजुरी दिली आहे. यात संबंधित पायाभूत विकास मंत्रालयाच्या नेटवर्क नियोजन विभागाचे प्रमुख असतील आणि ते सचिवांच्या गटाला मदत करतील.

कामांची पुनरावृत्ती टाळणार
तसेच नेटवर्कच्या संपूर्ण एकत्रीकरणामधली गुंतागुंत लक्षात घेऊन कोणत्याही प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी कामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य नियोजन आणि सूक्ष्म नियोजन तपशीलाद्वारे लॉजिस्टिक खर्च कमी करणे, यासाठी आवश्­यक तांत्रिक क्षमता पुरवण्यासाठी तांत्रिक सहाय्य विभागाला मंजुरी दिली आहे.

तांत्रिक सहाय्य विभागाचे वैशिष्टे
तांत्रिक सहाय्य विभागामध्ये विमान वाहतूक, सागरी, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, रस्ते आणि महामार्ग, बंदरे इत्यादी विविध पायाभूत क्षेत्रातील तज्ञ असतील आणि शहरी आणि वाहतूक नियोजन, सार्वजनिक बांधकाम, उर्जा, पाइपलाइन, जीआयएस, आयसीटी, वित्त, बाजारपेठ पीपीपी, लॉजिस्टिक्­स, डेटा अ‍ॅनालिटिक्­स म्हणून विषय तज्ज्ञही असतील.
कोणाला होणार आर्थिक लाभ?
मल्टी मोडल कनेक्­टिव्हिटी आणि शेवटच्या मैलांपर्यंत कनेक्टिव्हिटी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने विभागीय विकेंद्रीकरण दूर करणे, अधिक समग्रपणे आणि एकात्मिक नियोजनासह प्रकल्पांची अंमलबजावणी करणे हा पीएम गतिशक्ती मास्टर प्लॅन उद्देश आहे. यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी करण्यात मदत होईल. याचा ग्राहक, शेतकरी, युवा तसेच व्यवसाय करणा-यांना मोठा आर्थिक लाभ होईल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या