29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Home१४ एप्रिल सार्वजनिक सुटी जाहीर

१४ एप्रिल सार्वजनिक सुटी जाहीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : येत्या १४ एप्रिलला भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये या दिवशी सुटी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुटी म्हणून जाहीर केला आहे.

कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने याचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे यंदापासून या दिवशी सरकारी कार्यालयांबरोबरच औद्योगिक आस्थापनांमध्ये सार्वजनिक सुटी देण्यात येणार आहे. डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बुधवार, १४ एप्रिल, २०२१ रोजी सार्वजनिक सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतामधील औद्योगिक आस्थापनांसह सर्व केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये निगोशिएबल इंस्ट्रूमेंट अ‍ॅक्ट १८८१ च्या सेक्शन २५ च्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सराकरने देखील गेल्या वर्षी १४ एप्रिल हा राष्ट्रीय हॉलिडे जाहीर केला होता.

 

बंगालमध्ये निवडणुकीत हिंसाचार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या