
रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली घटना
निलंगा : निलंगा तालुक्यात बोळेगाव येथे घटना घडलेली असून होम क्वारंटाईन होण्यावरून घडलेला वाद आहे. मुंबईला राहणारा व नुकताच गुजरातहून ट्रक घेऊन आलेल्या एकास होम क्वारंटाईन व्हावे, असे सांगितल्याने वाद झाला. त्यात नातेवाईकांत तुंबळ हाणामारी होऊन दोघांचा खून झाला. ही घटना रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले, विद्यमान बरमदे हा मुंबईला वास्तव्याला असतो.
तो ट्रॅक घेऊन गुजरातहून बोळेगाव येथे आला अशी माहिती कळल्याने बोळेगावातील पुढाकार घेणारे शत्रुघ्न पाटील यांनी विद्यमान बरमदे यास होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला, त्यावरुन बरमदे व पाटील यांच्यात वाद झाला.
Read More मुखेड येथील पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील ६ जणांचा अहवाल निगेटिव्ह
दरम्यान बरमदे यांची बहीण शेजारील चांदोरी गावात राहते. तो तिथे गेला. नंतर पहाटे बोळेगावात आल्यावर हाणामारी झाली असून त्यात फिर्यादी शत्रूघ्न पाटील यांचे वडील शहाजी पाटील व त्यांचा पुतण्या वैभव पाटील ठार झाले.
तर शत्रुघ्न पाटील गंभीर जखमी झाले, अशी प्राथमिक माहिती आहे असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. माने म्हणाले.
सदर घटनेत विद्यमान बरमदे यासह सहाजण आरोपी असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कासारशिरसी पोलिसांनी सांगितले