नवी दिल्ली :जो बायडेन यांच्या नावाची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा झाल्यानंतर जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याच दरम्यान, जम्मू काश्मीर युथ काँग्रेसच्या एका नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. काँग्रेसचे तरुण नेते जहांजेब सिरवाल यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या एका व्हिडिओ संदेशात ‘बायडेन भारत सरकारवर दबाव तयार करून जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० आणि ३५ ए पुन्हा एकदा लागू करवून घेणार’ असे या व्हिडिओत सिरवाल बोलताना दिसत आहेत. सिरवाल यांच्या वक्तव्यावरून नवा वाद उभा राहिला आहे.
अमेरिकेत जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा विजय हा लोकशाहीचा विजय असल्याचे सिरवाल यांनी म्हटले आहे. बायडन यांच्या विजयाचा मोठा परिणाम जगासहीत भारत आणि भारताच्या राजकारणावरही पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.‘लोकशाहीचा गळा दाबून भारत सरकारने ४ आॅगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवण्याचा घेतलेल्या निर्णयावरही याचा परिणाम होईल. बायडन यांच्याद्वारे भारत सरकारवर दबाव आणून जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्यात येईल, असा मला विश्वास आहे’ असेही जहांजेब सिरवाल यांनी म्हटले आहे.
‘इस्लामोफोबिया’ संपणार
जम्मू काश्मीरच्या राजकारणावरही बायडन यांच्या विजयामुळे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तस्ेच जगात फैलावण्यात येणाºया ‘इस्लामोफोबिया’मध्येही घट दिसून येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी रविवारी केलेल्या दाव्यानुसार, काँग्रेसदेखील पीपल्स अलायन्सचा भाग आहे तसेच जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका मिळून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,असे म्हटले आहे.
गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करा