22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeमहाराष्ट्रआर्यन खानला जामीन नाहीच

आर्यन खानला जामीन नाहीच

एकमत ऑनलाईन

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या जामिनावर बुधवार दि. २० ऑक्टोबर रोजी न्यायालयात निर्णय देण्यात आला असून, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान आर्यन खानला विशेष न्यायालयाने जामीन नाकारला आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले.

आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. कॉर्डेलिया क्रूझ येथे छापा टाकल्यानंतर त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. आर्यन खानच्या जामिनावर प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. आजही एनडीपीएस न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलेला नाही. बुधवारी एनसीबीने कोर्टात आर्यनच्या अशा काही चॅट सादर केले आहेत, जे ड्रग्ज विषयी होते. सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्यन आणि मर्चंट मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आणि धामेचा भायखळा महिला कारागृहात आहेत.

आरोपी आर्यन खान आणि इतरांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (सी), २० (बी), २७, २८, २९ आणि ३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामिनावर न्यायालयात गेल्या सुनावणी दरम्यान, एनसीबीने म्हटले की, आर्यन खान गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे ड्रग्ज घेत होता असे पुरावे दर्शवतात. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने असेही म्हटले होते की आर्यनच्या ताब्यातून काहीही सापडले नाही, पण त्याच्या चॅटमधून त्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे.

जामीनासाठी उच्च न्यायालयात जाणार
आर्यन खानच्या वकिलांनी ते उच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. मुंबई विशेष न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते आता आर्यन खानच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करतील. काही काळासाठी आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागेल. याआधी एनसीबीने जामीनाच्या सुनावणीआधी आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅंिटग केल्याची माहिती कोर्टात दिली आहे. एनसीबीने हे संभाषण कोर्टात सादर केलं आहे. गेल्या सुनावणीत एनसीबीने कोर्टात ही माहिती दिली आहे.

सत्यमेव जयते : वानखेडे
आर्यन खानच्या जामिनावर प्रदीर्घ चर्चेनंतर न्यायालयाने त्याला दिला न देण्याचा निर्णय दिलाय. एनडीपीएस न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलेला नाही. बुधवारी एनसीबीने कोर्टात आर्यनचे असे काही चॅट सादर केले की जे ड्रग्ज विषयी होते. याच आधारावर न्यायालयाने जामीन नाकारल्याचा म्हटले जात आहे. असे असतानाच समीवर वानखेडे यांनी आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, सत्यमेव जयते असे म्हणत प्रतिक्रिया दिल्याचे म्हटले आहे. सत्याचाच विजय होणार असे वानखेडे यांना या वक्तव्यामधून अधोरेखित करायचे होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या