26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रआर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ

आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील स्पेशल एनसीबी न्यायालयाने गुरूवार दि. २१ ऑक्टोबर रोजी आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवली. यात आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे. व्हीडीओ कॉन्फरन्स किंवा प्रत्यक्ष आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले नाही. ७ ऑक्टोबरला आर्यन खानला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यन खान याला आज हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. त्याच्या जामिन अर्जासाठी वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली. मात्र यावरची सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे.

मागच्या तीन आठवड्यापासून आर्यन खान तुरुंगात आहे. आज शाहरुख खानने आर्थर रोड कारागृहात जाऊन आर्यनची भेट घेतली. १५ मिनिटांसाठी ही भेट झाली. कारागृहात असताना व्हीडीओ कॉलिंगद्वारे त्याने आई गौरी खान आणि वडील शाहरुख यांच्याशी संवाद साधला होता. मात्र आज पहिल्यांदाच शाहरुख आणि आर्यनची भेट झाली आहे. ड्रग्ज प्रकरणात आता आर्यनच्या जामिनाचा निर्णय उच्च न्यायालयावर अवलंबून आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या