27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeखबरदारी म्हणून सुमारे 35 हजार बेडची यंत्रणा तयार

खबरदारी म्हणून सुमारे 35 हजार बेडची यंत्रणा तयार

एकमत ऑनलाईन

पुणे – शहरात वाढता करोनाचा प्रसार रोखण्यासाठी संशयितांचे नमुने तपासणी वाढवली आहे. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या वाढत आहे. यावरही संसर्ग वाढल्यास खबरदारी म्हणून सुमारे 35 हजार बेडची यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला करोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण 52 टक्‍के आहे. त्यामुळे एवढ्या बेडची आवश्‍यकता भासणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

शहरात 9 मार्च रोजी पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर गेल्या 2 महिने 10 दिवसांत हा बाधितांचा आकडा 3 हजार 700 च्या घरात गेला आहे. तर, 1,900 रुग्णही बरे झाले असून सुमारे 200 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 1,500 रुग्ण महापालिकेच्या कोव्हिड केअर सेंटर, दवाखाने आणि खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

Read More 10 ते 12 मृत्युमुखी : पश्चिम बंगाल, ओदिशात अम्फान चक्रीवादळाचा कहर

विलगीकरणासाठी सुमारे 4 हजार 50 बेडची तयारी महापालिकेने केलेली असून सुमारे 1,808 जण येथे सध्या वास्तव्याला आहेत. त्यामुळे तातडीची गरज म्हणून आणखी 12 हजार बेड महापालिका प्रशासनाकडून विलागीकरणासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. तर, लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्यास बालेवाडी येथे 5 हजार बेड तयार आहेत. तर ही संख्या आणखी वाढली, तरी अवघ्या 8 दिवसांत 35 हजार बेड उभारण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यामुळे पुढील काळात परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास प्रशासन त्यापासून निपटण्यासाठी सज्ज असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

घरीच विलगीकरण सुरू
संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्यानंतर ज्या संशयितांच्या घरात स्वच्छतागृह नाही, त्यांना संस्थात्मक विलगीकरण केले जात आहे. तर, ज्यांच्या घरी विलगीकारणासाठी जागा आहे, तसेच स्वतंत्र स्वछतागृह आहे त्यांना 14 दिवस घरातच विलग केले जात असल्याचे सांगण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या