22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रदेवीच्या मूर्तीवरून तब्बल अकराशे किलो काढला शेंदूर

देवीच्या मूर्तीवरून तब्बल अकराशे किलो काढला शेंदूर

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : सप्तशृंगी देवीची मूर्ती संवर्धन व देखभाल कामकाजामुळे दीड महिना मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्या अनुषंगाने मूर्ती संवर्धन व देखभालीचे काम पूर्ण झाले असून भगवतीच्या मूळ रूपाचे दर्शन होत आहे. देवीच्या मूर्तीवरून अकराशे किलो शेंदूर काढण्यात आल्यानंतर सप्तशृंगी देवीचे मूळ रूप पहिल्यांदाच भाविकांसमोर आले आहे.

भगवतीचे मूर्ती संवर्धन आणि देखभाल करण्यासाठी मागील ४५ दिवसांपासून मंदिर दर्शनासाठी बंद असून मूर्ती संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. अशातच देवीच्या मूर्तीचे काही फोटो समोर आले आहेत. एकूणच मूर्तीचा झालेला कायापालट पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

नाशिकच्या सप्तशृंगी गडावर काही दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने भाविकांसह मंदिर प्रशासनाची तारांबळ उडाली होती. यानंतर मंदिर देखभालीसाठी तसेच देवी मूर्तीच्या संवर्धनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मूर्ती संवर्धन प्रक्रिया केल्यानंतर भगवतीवरील मागील क्रित्येक वर्षांपासून साचलेला शेंदूर लेपणाचा भाग धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला आहे. त्यानंतर सहा ते आठ सप्टेंबर दरम्यान धार्मिक पूजा हवन विधीचे आयोजन केल्यानंतर आता पितृपक्षात सर्व भक्तांच्या कल्याणासाठी सोळाशे देवी अथर्वशीर्ष पठण अनुष्ठान होत आहे. तर यंदाच्या घटस्थापनेला म्हणजेच पहिल्या माळेला देवीचे मूळ रूप दर्शनासाठी खुले होणार आहे.

त्यामुळे घटस्थापनेला सप्तशृंगी मातेच्या मूळ रूपाचे दर्शन सर्व भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी भाविकांनी व्यवस्थापनास योग्य सहकार्य करावे असे आवाहन विश्वास त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यपीठ म्हणून ओळख असलेल्या वणी येथील सप्तशृंगी देवीचे मंदिर मूर्तीसंवर्धन आणि देखभालीसाठी बंद करण्यात आले होते. मंदिरातील देवीच्या गाभा-यामध्ये काम करण्यासाठी हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. मूर्ती संवर्धन आणि मंदिराचे काम अशा दोन्ही कामांसाठी आणखी काही कालावधीसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अनेक वर्षांपासून शेंदूर लेपन
नाशिकचे सप्तशृंगी देवी मंदिर राज्यासह देशात प्रसिध्द आहे. नाशिकजवळील वणी येथील गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. मंदिरातील देवी मूर्तीवर वर्षानुवर्षे शेंदूर लेपन सुरू आहे. पुरोहितांनी सन २०१२ मध्येच विश्वस्त मंडळाकडे मूर्ती संवर्धनासाठी मागणी करीत पाठपुरावा केला होता. देवीचा शेंदूर काढण्याची सर्व प्रक्रिया ही पुरातत्व खात्याच्या नियमानुसार करण्यात आली. यामध्ये कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा वापर करण्यात आला नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या