24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पेजवर एकनाथ शिंदेंचा फोटो अपलोड होताच कमेंट्सचा पाऊस

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पेजवर एकनाथ शिंदेंचा फोटो अपलोड होताच कमेंट्सचा पाऊस

एकमत ऑनलाईन

मुंबई : मागील दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्याचा शेवट सर्वांना धक्का देणारा ठरला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागली आहे. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला असला तरी शिवसैनिकांचा एक मोठा वर्ग त्यांच्यावर नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.

मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ‘सीएमओ महाराष्ट्रा’ या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत फेसबूक खात्यावरून एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेक नेटक-यांनी आणि शिवसैनिकांनी यावर प्रतिक्रिया देत आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तर काहीही अनफॉलो करत निषेध व्यक्त केला आहे.

संबंधित पोस्टला आतापर्यंत १६ हजाराहून अधिक लाइक्स मिळाले असून जवळपास तीन हजार प्रतिक्रिया आल्या आहेत. यातील बहुतांशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील आहेत. अवेकांनी त्यांना गद्दार म्हटलं असून अनाजी पंत या इतिहासातील व्यक्तीशी तुलना केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या