23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeनांदेडनांदेडमध्ये एनडीआरएफ दाखल होताच झारखंडच्या दोघांना मिळाले जीवदान

नांदेडमध्ये एनडीआरएफ दाखल होताच झारखंडच्या दोघांना मिळाले जीवदान

एकमत ऑनलाईन

नांदेड : मुसळधार पावसाने बामणी ता.अधार्पूर येथे आलेल्या पुराच्या पाण्यात झारखंड राज्यातील दोन नागरिक अडकले होते. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत माहिती मिळताच एनडीआरएफच्या जवानांनी या दोघांना सुखरूप बाहेर काढले आहे.

नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस शनिवारी सकाळपर्यंत सुरूच होता़ या पावसाने अनेक भागातील नदी, नाल्यांना पुर आला आहे़ बामणी ता.अधार्पूर येथे आलेल्या अशाच पुरात झारखंड राज्यातील दोन नागरिक अडकले होते़ याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना कळवली़ याची तत्काळ दखल घेत डॉ़ विपीन यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारन दल अर्थात एनडीआरएफ पथकास पाचारण केले़या पथकातील जवानांनी झारखंडच्या या दोन्ही नागरिकांना सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.

यावेळी तहसीलदार उज्वला पांगरकर, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांच्यासह महसूल, पोलिस कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या