कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोल्हापूरच्या दौ-यावर असताना घडलेल्या एका घटनेची राज्यभरात जोरदार चर्चा होत आहे. वाहतूक कोंडीमुळे आव्हाड यांचा ताफा अडकल्याने वाट मोकळी करून देताना पोलिस कर्मचा-याने एका कारचालकाला चापट लगावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जितेंद्र आव्हाड कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. यावेळी आव्हाड हे अंबाबाई दर्शनासाठी निघाले होते. कोल्हापूरच्या भाऊसिंहजी रस्त्यावर जितेंद्र आव्हाड यांचा ताफा पोहोचला. मात्र यावेळी आव्हाड यांच्या ताफ्याला वाट मोकळी करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
आव्हाडांचा ताफा जात असताना अचानक एका चौकात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे गाड्यांना बाजूला हटवताना पोलिसांची एकच धावपळ उडाली. यावेळी संतापलेल्या पोलीस हवालदाराने थेट एका वाहनचालकावर हात उचलला.