22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रआशिष शेलार यांचे आरोप खोटे

आशिष शेलार यांचे आरोप खोटे

एकमत ऑनलाईन

बीड : आशिष शेलार यांचे आरोप खोटे असून हा प्रकल्प गुजरातेत कसा गेला याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. त्याचबरोबर पालकमंत्री न नेमल्याच्या कारणावरून त्यांनी सरकारला खडसावले आहे. वेदांता हा प्रकल्पसुद्धा महाराष्ट्रात आला पाहिजे आणि अजूनही प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सरकारने ताकद लावायला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

महाविकास आघाडीच्या काळातील प्रकल्पाला स्थगिती देणे अयोग्य असून आरोप-प्रत्यारोप केल्याने महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत. वेदांता महाराष्ट्रात येण्यासाठी सरकारने जे काही प्रयत्न करायचे असतील ते करावेत आणि हा प्रकल्प महाराष्ट्रात आणावा असे ते म्हणाले आहेत.

वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने टक्केवारी मागितली होती, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. बीडमध्ये ते माध्यमांशी संवाद साधत होते.

आशिष शेलारांनी काय केले होते आरोप?
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प दीड लाख कोटींचा होता पण महाविकास आघाडीने कंपनीकडे किती टक्के मागितले होते. ठाकरे सरकारने या कंपनीकडे १० टक्के रक्कम मागितली की पालिकेतल्या नियमानुसार रक्कम मागितली? असा खोचक सवाल आणि आरोप शेलारांनी केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या