जयपूर – राजस्थानमध्ये राजकीय नाट्यामध्ये रोज नवनवे आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. सचिन पायटल यांना कमी वयातच खूप काही मिळाले होते. मात्र मात्र त्यांनी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ते अकार्यक्षम आहेत, हे मला आधीपासून माहिती होते, अशी बोचरी टीका गलहोत यांनी केली.
त्यांच्याविरोधात कधी काही बोललो नाही. आम्ही सर्वांनी त्यांना सन्मान दिला
राजस्थानमधील सत्तासंघर्षात पायलट यांच्यावर आघाडी घेतल्यानंतर आता अशोक गहलोत हे त्यांच्याविरोधात आक्रमक होऊ लागले आहेत. गहलोत म्हणाले की, आम्ही सचिन पायलट यांच्याबाबत कधीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. राजस्थान हे असे राज्य असावे जिथे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना बदलण्याची मागणी झाली नाही. ते बिनकामाचे आहेत, अकार्यक्षम आहेत, हे आम्हाला माहिती होते. मात्र आम्ही त्यांच्याविरोधात कधी काही बोललो नाही. आम्ही सर्वांनी त्यांना सन्मान दिला.
जो काही खेळ झाला आहे तो १० मार्चलाच होणार होता
गहलोत पुढे म्हणाले की, आता हा जो काही खेळ झाला आहे तो १० मार्चलाच होणार होता. मात्र तेव्हा आम्ही हा प्रकार सर्वांसमोर आणला. सचिन पायलट यांची काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा होती. मोठमोठे कॉ़र्पोरेट त्यांना फंडिंग करत आहेत. तसेच भाजपाकडूनही फंडिंग केली जात आहे. मात्र आम्ही या सर्व् कारस्थानाची पोलखोल केली.
सचिन पायलट यांच्यावतीने कोर्टात महागडे वकील लढत आहेत. त्यांचे पैसे कुठून येत आहेत?
आज देशात गुंडगिरी सुरू आहे. मनमानी पद्धतीने छापे टाकले जात आहेत. माझ्या निकटवर्तींयांच्या घरांवर छापे पडणार याची कुणकूण मला दोन दिवस आधीच लागली होती. सध्या सचिन पायलट यांच्यावतीने कोर्टात महागडे वकील लढत आहेत. त्यांचे पैसे कुठून येत आहेत. सचिन पायलट हे पैसे देत आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एकीकडे सचिन पायलट यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच गहलोत हे मात्र त्यांच्यावर थेट टीका करत आहेत. गहलोत यांनी यापूर्वीही पायलट यांच्यावर टीका केली होती. राजस्थानमधील सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट एकमेकांवर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर टीका केली आहे.
भाजपच्या समर्थनाने मागील 6 महिन्यांपासून कट रचत होते
गेहलोत म्हणाले की, सचिन पायलट भाजपच्या समर्थनाने मागील 6 महिन्यांपासून कट रचत होते. सरकार पाडण्याचा कट रचला जात असल्याचे जेव्हा मी सांगत होतो, त्यावेळी कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. कोणालाही माहिती नव्हते की, निरागस चेहरा असणारी व्यक्ती असे काम करेल. मी येथे भाजी विकायला आलेलो नाही. मी राजस्थानचा मुख्यमंत्री आहे. “एक छोटी खबर भी नहीं पढ़ी होगी किसी ने कि पायलट साहब को कांग्रेस प्रदेशाध्यक्ष के पद से हटाना चाहिए। हम जानते थे कि वो (सचिन पायलट) निकम्मा है, नकारा है, कुछ काम नहीं कर रहा है खाली लोगों को लड़वा रहा है”: राजस्थान के मुख्यमंत्री अशोक गहलोत
एवढा सन्मान मिळाला, ते काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्यास तयार झाले
गेहलोत पुढे म्हणाले की, एक छोटी बातमी कोणी वाचली नसेल की पायलट साहेबांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले पाहिजे. आम्हाला माहिते आहे ते निरुपयोगी व काहीही कामाचे नाहीत. काहीही काम करत नाही, केवळ लोकांमध्ये भांडण लावत आहे. इतिहासातील हे पहिले उदाहरण असेल जेव्हा पक्षाचा अध्यक्षच आपल्याच सरकारला पाडण्याच्या कटात सहभागी होता. ते म्हणाले की, ज्या प्रदेशाध्यक्ष पायलट यांना प्रदेशात एवढा सन्मान मिळाला, ते काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्यास तयार झाले.
Read More कोर्टाने आश्चर्य व्यक्त केलं : दुबेवर इतके केसेस असतानाही जामीन कसा?