19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeराष्ट्रीयअध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अशोक गेहलोतांचा पत्ता कट?

अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अशोक गेहलोतांचा पत्ता कट?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजस्थानात अडीच वर्षांपूर्वी आलेल्या राजकीय संकटाचा दुसरा भाग पुन्हा पाहायला मिळत आहे. यावेळी पात्रं बदलली आहेत. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या शक्यतेवर अशोक गेहलोत गटातील आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे अशोक गहलोत यांच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी गहलोत यांची नियुक्ती आणि नव्या मुख्यमंत्रिपदाच्या निवड प्रक्रियेवर साशंकता निर्माण झाली आहे. काँग्रेसचा संघर्ष आता लांबण्याची शक्यता असून गहलोत-पायलट गटामध्ये तळागाळापर्यंत कुरघोडीचं राजकारण आणि संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यातच आता राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. गेहलोत समर्थक आमदारांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अशोक गेहलोत यांचा पत्ता कट होण्याची चर्चा सुरु आहे. एवढंच नव्हे तर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत शशी थरूर, दिग्विजय सिंह, कमलनाथ, मुकुल वासनिक, केसी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांसारखे पक्षाचे बडे नेते उतरले आहेत. अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी हायकमांडच्या इच्छेविरोधात जाऊन राजीनामे दिल्याने राजस्थानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली.

गांधी परिवाराचा अपमान
गहलोत यांच्या या कृत्यामुळे गांधी परिवाराचा अपमान आणि विश्वासाला धक्का बसला आहे. त्यामुळेच काँग्रेस वर्किंग कमिटीने अशोक गेहलोत यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून वगळण्याची शिफारस सोनिया गांधींकडे केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या